फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) रहात असलेल्या वास्तूविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘२.२.२०२२ या दिवशी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) (पू. नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सासूबाई) सनातनच्या ११७ व्या संतपदावर विराजमान झाल्या. फोंडा, गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी हा संतसन्मान सोहळा पार पडला. तेव्हा मला तेथे उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांच्या वास्तूविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी
‘पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ रहात असलेल्या वास्तूत प्रवेश करण्यापूर्वी माझे मन निर्विचार आणि शांत झाले.
२. वास्तूत प्रवेश केल्यावर
२ अ. ‘पू. सिंगबाळआजींचे घर रामनाथी आश्रमाची प्रतिकृती आहे’, असे वाटणे : मला त्यांच्या वास्तूत पुष्कळ शांत वाटत होते. ‘ती वास्तू म्हणजे रामनाथी आश्रमाची प्रतिकृतीच असून या लहानशा प्रतिकृतीत चैतन्य भरले आहे’, असे मला वाटत होते. तेथे गेल्यावर मला रामनाथी आश्रमात आल्यासारखे वाटले.
२ आ. देवघर : तेथील देवघरही मला रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरासम सुंदर वाटत होते. तेथून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यामुळे माझ्या मनाची एकाग्रता साधली जात होती.
२ इ. लादी : मला लादीचा स्पर्श पुष्कळ गुळगुळीत आणि हवाहवासा वाटत होता. हे सर्व अनुभवतांना मी भावस्थितीत होते.
२ ई. वास्तूतील प्रत्येक निर्जीव वस्तूही चैतन्य प्रक्षेपित करत होती.
आपण ‘पूर्वीच्या संतांच्या वस्तू आणि ते रहात असलेली वास्तू ज्या भक्तीभावाने पहातो, तसेच ‘येथील प्रत्येक वस्तूही पुढे जतन होईल’, असा विचार माझ्या मनात आला.
परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि सद्गुरु यांच्या कृपेने मला या अनुभूती सहजतेने घेता आल्या. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |