नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी भारतात घुसलेल्या रिझवान याने तोडली होती महाराजा रणजितसिंह यांची मूर्ती !
श्रीगंगानगर (राजस्थान) – येथील सीमेवरून अटक करण्यात आलेला अशरफ पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा सदस्य असून त्याने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता, ही माहितीही उघड झाली होती. त्याच्या चौकशीत त्याने पाकच्या लाहोर येथील गडावर असणारी महाराजा रणजित सिंह यांची मूर्ती तोडली असल्याची नवीन माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
Rajasthan: Rizwan Ashraf who crossed border to kill Nupur Sharma belongs to terrorist group Tehreek-i-Labbaik Pakistan, has criminal recordhttps://t.co/Ibk7JRQO0E
— OpIndia.com (@OpIndia_com) July 22, 2022