धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण
मध्यप्रदेशात नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचे प्रकरण
उज्जैन (मध्यप्रदेश) – राज्यातील मालवा येथे नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाचे कार्यकर्ते आयुष जाधव यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात ते घायाळ झाल्याने उपचारार्थ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमल, अरबाज, आसिफ, सरफराज, अम्मू मेवाती, चिकी, अमन, सोहेल, मुन्ना मेवाती, सलमान, फिरदौस, समीर आणि साजिद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांतील ८ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आरोपींच्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
MP में नूपुर शर्मा का समर्थन करने पर 26 साल के युवक पर जानलेवा हमला, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा ने सभी आरोपियों पर NSA लगाने की बात कही, 8 आरोपी गिरफ्तार#Nupur #MadhyaPradesh https://t.co/to6ftbZROV
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 21, 2022
संपादकीय भूमिकानूपुर शर्मा प्रकरणावरून धर्मांधांकडून हिंदूंना, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, हे गेल्या काही घटनांवरून लक्षात येत आहे. हिंदूंसाठी ही धोक्याचीच घंटा आहे. या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यास पर्याय नाही ! |