प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे मुलांना रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या दोघा धर्मांधांना अटक
प्रतापगड (उत्तरप्रदेश) – येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात एक वृद्ध मुसलमान लहान मुलांना रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देतांना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी इंतजार आणि गुलजार या दोघांना अटक केली आहे. हे दोघे भाऊ असून त्यांच्याकडून अनुज्ञप्ती असलेली रायफलही जप्त करण्यात आली आहे. त्यांची अनुज्ञप्ती रहित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हबीबी नावाची व्यक्ती रायफल चालवण्यास शिकवत होती. यात रायफलमध्ये गोळी भरण्यास आणि हवेत गोळीबार करण्यास शिकवले जात होते. या वेळी मोठ्या संख्येने मुसलमान उपस्थित असल्याचेही दिसत आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या कार्यक्रमांत काठ्या असल्या, तरी जणू ते आतंकवादी असल्यासारखे भासवणारे पुरोगामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी आता याविषयी काही बोलत का नाहीत ? |