श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून दिनेश गुणवर्धने यांची नियुक्ती
कोलंबो – श्रीलंकेचे ज्येष्ठ नेते दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. श्रीलंकेच्या संसदेने काही दिवसांपूर्वी रानिल विक्रमसिंघे यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली होती. श्रीलंकेला आर्थिक संकटातून सोडवण्याचा भार आता विक्रमसिंघे आणि गुणवर्धने या जोडीवर आहे. गेल्या आठवड्यात देशात प्रचंड गदारोळ आणि विरोध झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून गेले होते.
Dinesh Gunawardena sworn in as 15th Prime Minister of Sri Lanka
Read @ANI Story | https://t.co/TjnLKksb4i#SriLanka #DineshGunawardena #PrimeMinister pic.twitter.com/vIXrVfdfjr
— ANI Digital (@ani_digital) July 22, 2022