वास्को परिसरात गायींवर उकळते पाणी टाकणारी टोळी कार्यरत
टोळीवर कारवाई करा ! – आमदार कृष्णा साळकर यांची विधानसभेत मागणी
हिंदूंसाठी गाय मातेसमान आहे. त्यामुळे उकळते पाणी टाकण्यासारखे प्रकार कोणता समाज करत असणार, ते लक्षात येते !
पणजी, २१ जुलै (वार्ता.) – वास्को परिसरात गायींवर उकळते पाणी टाकण्याचा अमानुष प्रकार चालू आहेत. हे काम कोण करत आहे ? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी गोवा विधानसभेत २० जुलैला लक्षवेधी सूचनेच्या वेळी केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘मूक जनांवरांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. भाजलेल्या अवस्थेत गायी विव्हळत असतांना पहावत नाही. काही प्राणीप्रेमी संघटना त्यांच्यावर उपचार करत आहेत.’’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘या प्रकरणी अन्वेषण करून हे काम कोण करत आहे ? याचा शोध घेण्याचा आदेश देणार’, असे सांगितले.