सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित मुलांची समस्या कायम
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८९३ बालके अल्प वजनाची, तर ५९ बालके तीव्र अल्प वजनाची असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील ३५ सहस्र ७४१ बालके आहेत. या बालकांपैकी ३५ सहस्र ७१७ बालकांचे जूनच्या शेवटी वजन केले असता ८९३ बालके अल्प वजनाची असल्याचे स्पष्ट झाले. यांपैकी १२० बालकांमध्ये सुधारणा होत आहे, तर तीव्र अल्प वजनाच्या बालकांची संख्या ५९ एवढी आहे. यांपैकी ६ बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. तीव्र अल्प वजन असणार्या बालकांमध्ये सावंतवाडी तालुक्यात २०, कणकवलीत ७, मालवणमध्ये ७, वेंगुर्ल्यात १, कुडाळमध्ये १३, वैभववाडीत ३, देवगडमध्ये ६ आणि दोडामार्ग तालुक्यातील २ बालकांचा समावेश आहे.