हडपसर येथील पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांना लाच स्वीकारतांना अटक
पुणे – हडपसर पोलीस ठाण्यामध्ये उत्तरप्रदेशातील गोमतीनगर येथील ३२ वर्षीय व्यावसायिकाने २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदाराला त्यांचे २० लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी त्यांच्याकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली होती. कोरेगाव पार्कमधील ‘मोका हॉटेल’मध्ये लाचेची रक्कम स्वीकारतांना पोमन यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई १९ जुलै या रात्री साडेदहाच्या सुमारास केली गेली. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.