मूळच्या पुणे येथील महिलेची अमेरिकेतील ‘कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड !
पुणे – येथील ऋतुजा इंदापुरे यांना अमेरिकेतील समॅमिश शहराच्या ‘कौन्सिल मेंबर’ हा बहुमान मिळाला आहे. राष्ट्रीय बॅडमिंटनपटू असलेल्या इंदापुरे या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांचे पुढील शिक्षण आय.एल्.एस्. विधी महाविद्यालयात झाले. त्यांनी इंग्लंडमधून एल्.एल्.एम्. केले. त्या वॉशिंग्टन राज्याच्या ‘स्टेट वुमन कमिशन’च्या अध्यक्षा आहेत. त्या अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना यांमध्येही सक्रीय सहभागी आहेत. ‘शहरातील नगर नियोजनाकडे लक्ष देऊन नागरिकांना सुविधा देणार असल्याचा मानस आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले.