मंत्रीपद मिळवून देण्यासाठी १०० कोटींची खंडणी मागणार्या चौघांना अटक !
मुंबई – राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळवून देण्याचे आमीष दाखवून आमदाराकडे १०० कोटी रुपयांची मागणी करणार्या २ धर्मांधांसह ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रियाज अल्लाबक्ष शेख, जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर येथील आहेत. (वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करणे हाच एकमेव पर्याय आहे ! – संपादक)