कल्याण-डोंबिवली येथे वाहने चोरणारे मुसलमान अटकेत !
ठाणे, २१ जुलै (वार्ता.) – बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘ओएल्एक्स्’ या संकेतस्थळावरून चोरट्या वाहनांची विक्री करणारे मोहंमद अकबर अब्दुल अजीज शेख (वय २७ वर्षे) आणि अबू बकर उपाख्य जाफर अब्दुल अजीज शेख (वय २२ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या दुचाकी, रिक्शा अशी ११ वाहने जप्त केली आहेत. कल्याण आणि डोंबिवली येथे आतापर्यंत याच आरोपींनी वाहनांच्या चोर्या केल्याचा संशय पोलिसांना असून अन्य भागातील वाहनचोर्या त्यांच्याकडून उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दोन्ही आरोपींनी १४ चोरीचे गुन्हे केल्याच मान्य केले आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्यांक ! – संपादक)