चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे बोगस (खोट्या)आधुनिक वैद्यांचा सुळसुळाट !
पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंद, एकास अटक, तर चौघे जण पसार
जळगाव – जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसतांना रुग्णालय चालवणार्या बोगस आधुनिक वैद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. याविषयी तालुक्यातील मेहुणबार पोलीस ठाण्यात ३, तर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २ अशा एकूण ५ आधुनिक वैद्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांपैकी एकास पोलिसांनी कह्यात घेतले आहे. तालुक्यातील शासकीय वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. अन्य चौघे जण पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तालुक्यात आणखी काही असे आधुनिक वैद्य सापडण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिकाइतक्या मोठ्या प्रमाणात बोगस आधुनिक वैद्य त्यांची दुकाने थाटत असतांना वैद्यकीय विभागाला लक्षात न येणे, हे गंभीर ! बोगस पदवी देणारे आणि पदवी नसतांना सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणारे अशा दोघांनाही कठोर शासन करायला हवे ! |