कु. प्रज्ञा वागराळकर हिला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सेवा करतांना आलेली अनुभूती
१. चलचित्र संग्रहित करण्याची सेवा करतांना चुका होण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याविषयी सूक्ष्मातून सुचवणे आणि त्यामुळे सेवेतील चुका टाळता येणे
‘माझ्याकडे चलचित्रे (‘व्हिडिओज्’) संग्रहित करण्याची सेवा आहे. त्या सेवेत पुष्कळ बारकावे असतात. माझ्याकडून काही बारकावे पहायचे राहिले किंवा त्यात काही चूक झाली, तर ती चूक सुधारण्यासाठी ४ ते ५ घंटे वेळ द्यावा लागतो. आता सेवा करतांना माझ्याकडून चूक होत असेल, तर प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला आतून सुचवत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. माझ्याकडून काही पालट करायचे राहिले असतील, तर ते मला नेहमी आतून विचार देतात. आरंभी मी अशा विचारांकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे माझ्याकडून चुका व्हायच्या. आता मला अशा चुका टाळता येतात.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दायित्व घेऊन सेवा शिकण्याची पूर्वसूचना देणे
आरंभी मला दायित्व असलेल्या सेवा स्वीकारता येत नव्हत्या. तेव्हा ‘तुला त्या शिकून घ्यायला हव्यात’, असे प.पू. डॉक्टर मला सुचवत होते; परंतु दायित्व असलेले साधक आहेत, तर आपण त्या शिकायला नकोत’, असा माझा विचार असायचा. दोनच दिवसांनी दायित्व असलेले साधक सेवेसाठी येऊ शकणार नसल्याचा निरोप आला आणि सेवेचे दायित्व माझ्याकडे आले. तेव्हा देवानेच मला पूर्वसूचना देऊन माझ्या मनाची सिद्धता करून घेतल्याचे मला जाणवले.’
– कु. प्रज्ञा वागराळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |