‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांची खाती गोठवल्याने जनतेचे रस्त्यांवर उतरून आंदोलन !
बँकांच्या सुरक्षेसाठी सैन्याने रस्त्यांवर उतरवले रणगाडे !
हेनान (चीन) – चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम ही ‘गुंतवणूक उत्पादन’च्या रूपात असल्याचे कारण देत ग्राहकांना ती काढता येणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे हेनान प्रांतात सहस्रो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. बँकांच्या बाहेर ग्राहक मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यामुळे बँकांच्या सुरक्षेसाठी बँकांसमोर सैन्याने रणगाड्यांची रांग उभी केली आहे. ‘खात्यातून पैसे काढू देण्याची मुभा द्या’, अशी ग्राहकांची मागणी आहे. ‘ग्राहकांनी जमा केलेली रक्कम त्यांना १५ जुलैपर्यंत परत केली जाईल’, असे आश्वासन हेनान प्रांतात असलेल्या बँकांनी दिले होते; मात्र मोजक्याच ग्राहकांना पैसे मिळाले. अन्य लोकांचे पैसे मात्र अडकून पडले.