नूंह (हरियाणा) येथे डंपरद्वारे करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकांच्या हत्येच्या प्रकरणी शब्बीर याला अटक
नूंह (हरियाणा) – येथे अवैध उत्खननाला विरोध करणारे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र सिंह यांच्या यांच्या अंगावर डंपर घालून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी शब्बीर याला पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली. अटक करण्याच्या वेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात त्याला गोळी लागल्याने तो घायाळ झाला. यापूर्वी त्याचा सहकारी इकरार याला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करतांना त्यानेही पोलिसांवर गोळीबार केला होता.
The Haryana Police have arrested the driver of a truck that ran down a 59-year-old DSP earlier this week. In a shocking incident on Tuesday, the DSP was crushed by a local truck due to his crackdown on illegal mining activities in the Aravalli hills area.https://t.co/jdNOKGcA4x
— NewsBytes (@NewsBytesApp) July 21, 2022
संपादकीय भूमिकाहरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने आता अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. तसेच राज्यातील धर्मांध खाण माफियांची पाळेमुळे खणून काढून ती नष्ट केली पाहिजेत ! |