अभिवचन रजेवर सोडलेले ८३३ बंदीवान पसार !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कोरोना महामारीच्या संसर्गाच्या काळात राज्यातील कारागृहातून अभिवचन रजेवर (‘पॅरोल’वर) सोडलेल्या ४ सहस्र २४० बंदीवानांपैकी ८३३ कैदी पसार झाले आहेत. रजेचा कालावधी संपवून कारागृहात परत न आलेल्या १४३ बंदीवानांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत. ४ सहस्र २४० बंदीवानांपैकी ३ सहस्र ३९५ बंदीवान कारागृहात परतले आहेत. रजेच्या कालावधीत ८ बंदीवानांचा मृत्यू झाला, तर ४ बंदीवान निर्दोष मुक्त झाले; मात्र ८३३ बंदीवान अद्यापही कारागृहात परतलेले नाहीत. यामध्ये संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांची संख्या सर्वाधिक आहे.या रजा महाराष्ट्र कारागृह नियम १९५९ मधील नियम २० अन्वये शिक्षा माफीमध्ये गणल्या जाणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

बंदीवान पसार होण्याच्या घटना अनेक ठिकाणच्या कारागृहांत घडत असतांना रजेची सुविधा ठेवणे कितपत सयुक्तिक आहे, याचा पुनर्विचार कारागृह प्रशासनाने करायला हवा !

पसार बंदीवानांना शोधण्यात पोलिसांचा नाहक वेळ आणि श्रम वाया जाणार, शिवाय ते गुन्हेही करणार. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पॅरोल संदर्भातील सुधारित धोरण लवकर ठरवणे अपेक्षित !