रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. ‘आश्रम पाहून ‘सनातन संस्थेचे कार्य अतिशय अद्भुत आणि देशाला दिशा देणारे, तसेच मन अन् बुद्धी यांना सात्त्विक करणारे आहे’, असे मला वाटले. ‘आश्रम पाहिल्यावर आम्हाला जे शिकायला आणि अभ्यासायला मिळाले, ते कृतीत आणता येण्यासाठी आशीर्वाद मिळावेत’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’ – श्री. लखन दिलीप जाधव (प्रधान आचार्य, सव्यसाची गुरुकुलं), जिल्हा कोल्हापूर (१७.६.२०२२)

२. ‘आश्रम पाहिल्यावर मला सकारात्मकता जाणवली. आश्रमातील सर्व साधकांचे चेहरे प्रफुल्लित दिसत होते.’ – श्री. भारत व. बेतकेकर, म्हापसा, गोवा. (१७.६.२०२२)

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेगुरुजी यांनी धर्मासाठी केलेले हे कार्य अजरामर आहे आणि ते कार्य अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे.’ – श्री. पंढरीनाथ कृष्णा पित्रे (निवृत्त सार्जंट, भारतीय वायूदल), सांखळी, गोवा. (१७.६.२०२२)

४. ‘साधक, त्यांची साधना आणि कार्य यांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच ! हे सर्व मानवाच्या कल्याणासाठीच चालले आहे; पण याची कल्पना मानवास नाही. त्याला जेव्हा ती कल्पना येईल आणि तो त्या दृष्टीने कार्य करू लागेल, तो खरा सोनेरी दिवस !’ – श्री. सचिन गणेश कुलकर्णी, कोल्हापूर, महाराष्ट्र. (१७.६.२०२२)