गेल्या ४६ वर्षांत पृथ्वीचा रंग पालटण्यामागे जागतिक तापमानवाढ कारणीभूत !
वॉशिंग्टन – युरोप, उत्तर आफ्रिका, मध्यपूर्व, तसेच आशिया या भागांत उष्णतेने कहर केला आहे. तापमानात होणारा हा पालट अमेरिकी खगोलशास्त्रीय संस्था ‘नासा’ने टिपला आहे. १२ जुलै या दिवशी ‘नासा’ने पृथ्वीचा एक नकाशा प्रसारित केला होता. नेहमी निळ्या रंगात दिसणारी पृथ्वी आता लाल भडक रंगात दिसत असल्याचे त्यातून समोर आले आहे. यामध्ये पृथ्वीच्या पूर्व गोलार्ध रेषेच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान दिसत आहे. सध्या ते तापमान ४० अंशांच्या वर आहे. ‘नासा’ने प्रसारित केलेल्या आणखी दोन नकाशांतून ‘गेल्या ४६ वर्षांत पृथ्वी कशी पालटत गेली’, याचे चित्रण आहे. ‘वर्ष १९७६ ते वर्ष २०२२ पर्यंत पृथ्वीचा रंग निळ्याकडून लाल होत गेला’, असे त्यातून दिसते.
मानवाकडून होणारे प्रदूषण आणि हरितगृह उत्सर्जन यांमुळे सातत्याने जलवायू परिवर्तन होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तापमानात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.
तापमानवाढीमुळे जागतिक स्तरावर झालेले भयावह पालट !
|
संपादकीय भूमिकाविज्ञानाच्या आधारे केलेल्या भौतिक प्रगतीच्या अतिरेकाचा परिणाम ! |