ब्रिटनमध्ये इस्लामविषयीच्या कथित द्वेषामुळे मुसलमानांच्या बेरोजगारीत वाढ !
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापिठाने केलेल्या संशोधनात ‘देशात ब्रिटीश खिस्ती समुदायाच्या तुलनेत मुसलमान महिला आणि पुरुष अधिक प्रमाणात बेरोजगार आहेत’, असे दिसून आले आहे. यामागे इस्लामविषयीचा कथित द्वेष, हे मोठे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. या संशोधनात १० वर्षांपासून युरोपीय देशांत वास्तव्याला असलेल्या ४० सहस्र कुटुंबांतील १ लाख व्यक्तींची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी वैयक्तिक मुलाखतीद्वारे माहिती एकत्रित करण्यात आली.
१. समीर मेटवेली आणि ‘इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्च कौन्सिल’ यांनी हे संशोधन केले आहे. ब्रिटनमध्ये मुसलमानांचे वय, निवासस्थान, शिक्षण, कुटुंबासह धार्मिकता, दृष्टीकोन, सामाजिक भागीदारीला निकष ठरवून अध्ययन करण्यात आले.
२. ब्रिटनमध्ये मुसलमानांतील बेरोजगारी धर्मामुळे नव्हे, तर त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनामुळे निर्माण झाल्याचे दिसून येते. श्वेत ब्रिटीश मुसलमानांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कृष्णवर्णीय मुसलमानांहून अल्प आहे. ते जवळपास ब्रिटीश ख्रिस्ती समुदायाएवढे आहे. इस्लामविषयीचा द्वेष, मुसलमानांचा वर्ण, संस्कृती आणि जन्मस्थान हेदेखील पक्षपात करण्याचे कारण ठरत असल्याचे अभ्यासातून दिसून आले. महिलांना त्याचा अधिक फटका बसू लागला आहे.
३. समीर मेटवेली म्हणाले की, पुरुषांमध्ये कॅरेबियन वंशातून आलेल्या पुरुषांमध्ये सर्वाधिक बेरोजगारी आहे. मुसलमान महिलांमध्ये अधिक बेरोजगारी दिसते. त्यातही पाकिस्तानी महिलांमध्ये अधिक बेरोजगारी दिसून येते.
संपादकीय भूमिकाब्रिटनसारख्या विकसित देशात ही स्थिती का निर्माण झाली, याचा विचार मुसलमानांनी करणे आवश्यक आहे. ब्रिटनच्या धड्यातून अन्य देशांतील मुसलमान शिकले नाही, तर सर्वत्र ही स्थिती लवकरच निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये ! |