चीनकडून नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण !
नेपाळमधील संघटनेकडून सरकारकडे कारवाईची मागणी
काठमांडू (नेपाळ) – चीनकडून नेपाळच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात घुसखारी करून अतिक्रमण करत असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील ‘राष्ट्रीय एकता अभियान’ या संघटनेने या संदर्भात देशाचे भूमी व्यवस्थापनमंत्री शशि श्रेष्ठ यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय एकता अभियानचे बिनय यादव यांनी या निवेदनात म्हटले आहे की, चीनने गोरखा येथील चुमानुबरी ग्रामीण नगर पालिका-१ मधील रुइला सीमेवरील भूमीवर नियंत्रण मिळवले आहे. मैत्रीच्या नावाखाली चीन घुसखोरी करत आहेत.
चीनने यापूर्वी जून मासामध्ये उत्तर गोरखा भागामध्ये अतिक्रमण केले होते. त्या वेळी नेपाळमधील प्रसारमाध्यमांनी याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. आता सरकार आणि गोरखा जिल्ह्यातील प्रशासन म्हणते की, त्यांना याविषयी काहीही माहिती नाही. (चीनचे बटीक झालेले नेपाळ सरकार ! नेपाळी जनतेने याकडे गांभीर्याने पाहून देशाच्या रक्षणासाठी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत, तसेच सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकायाला यापूर्वीच्या काही नेपाळी राज्यकर्त्यांचे चीनधार्जिणे धोरण कारणीभूत आहे ! |