बांगलादेशात हिंदूंच्या घरांची पुन्हा जाळपोळ
बांगलादेशात हिंदू असुरक्षित !
ढाका (बांगलादेश) – चित्तगांव जिल्ह्यातील सीताकुंडा उपजिल्हामधील बारबाकुंड युनियनमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर पुन्हा आक्रमण केले. या आक्रमणात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांची तोडफोड आणि नंतर जाळपोळ केली. या घटनेमुळे हिंदूंची अनुमाने १० कुटुंबे पूर्णपणे निराधार झाली आहेत. ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ही माहिती देण्यात आली.
Extremists once again set fire to the houses of Hindus in Barbakund Union of Sitakunda Upazila of Chittagong District, Bangladesh. According to sources, about 10 families have become completely destitute in this incident.#SaveBangladeshiHindus#IslamicTerrorismInBangladesh pic.twitter.com/WJhp2X9tJa
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) July 19, 2022
दोन दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी बांगलादेशातील नरेल जिल्ह्यात हिंदूंची घरे, तसेच मंदिरे यांवर आक्रमण केले होते. या आक्रमणाच्या वेळीही हिंदूंची घरे, मंदिरे आणि दुकाने जाळण्यात आली होती. एका हिंदु युवकाने कथितरित्या केलेल्या ईशनिंदेमुळे हे आक्रमण करण्यात आले होते.