देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !
नवी देहली – येथील मुसलमानबहुल सीलमपूर भागात पुलाच्या खालून जाणार्या कावड यात्रेवर अज्ञातांनी मांसाचा तुकडा टाकल्याने येथे तणाव निर्माण झाला. येथे जवळपास एक घंटा रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. याविषयी एका कावड यात्रेकरूने, ‘आम्ही या भागात येईपर्यंत स्थिती चांगली होती. सर्वत्र आमचे स्वागत करण्यात येत होते; मात्र सीलमपूरमध्ये आल्यावर आमच्यावर मांस फेकण्यात आले. ‘ते कधी आणि कुणी टाकले ?’, हे लक्षात आले नाही’, असे सांगितले.
Delhi: Meat thrown at Kanwar Yatris in Delhi’s Seelampur, police initiate probe after protests, video viralhttps://t.co/eCjt9M7fUg
— OpIndia.com (@OpIndia_com) July 20, 2022
संपादकीय भूमिका‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते ! |