‘गूगल मॅप्स’कडून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर !
संभाजीनगर – ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या निर्णयानंतर ‘गूगल मॅप्स’वरही औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचा ‘धाराशिव’असा उल्लेख करण्यात आला आहे. आता ‘गूगल मॅप्स’वर ‘औरंगाबाद’ असे शोधले असता मराठीत औरंगाबाद आणि इंग्रजीत ‘संभाजीनगर’, तर ‘उस्मानाबाद’ असे शोधले असता मराठीत उस्मानाबाद अन् इंग्रजीत ‘धाराशिव’ असा उल्लेख आढळतो.