उंड्री (पुणे) येथील एका अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बसचालकाकडून अत्याचार !
पालकांनीही मुलींवर लक्ष ठेवणे आवश्यक, हे दर्शवणारी घटना !
पुणे – ‘शाळेतून घरी येण्यास विलंब का झाला ?’, असे वडिलांनी विचारल्यानंतर १० वी मध्ये शिकणार्या मुलीने घाबरून तिच्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. वडिलांनी हा प्रकार कोंढवा पोलिसांना सांगितला. प्रत्यक्षात पोलिसांनी त्या मुलीकडे अधिक चौकशी केली असता तिचे शाळेच्या बसचालकासमवेत संबंध असून तो तिच्यावार अत्याचार करत होता, असा खुलासा मुलीने केला. या प्रकरणी ३५ वर्षीय स्कूल बसचालक सोमेश्वर घुले पाटील याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मार्च २०२२ ते गुन्हा नोंद करण्यापर्यंत घडला आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये तिचे शारीरिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वडाची वाडी परिसरामध्ये (उंड्री, पुणे) रहाणारी ही मुलगी सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कूल बसमधून शाळेत ये-जा करीत होती. त्यांच्यात ओळख झाली. सोमेश्वर याने ‘आपण रिलेशनशिप’मध्ये राहूया का ?’, असे विचारले होते; परंतु ‘रिलेशनशिप’ म्हणजे काही ठाऊक नसतांनाही तिने होकार दिला. त्यानंतर सोमेश्वरने तिच्याशी बलपूर्वक शारीरिक संबंध ठेवले होते.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात अल्पवयीन मुली असुरक्षित असणे, हे दुर्दैवी आणि संतापजनक ! |