खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या ! – सुनील मोदी, शिवसेना
कोल्हापूर, १९ जुलै (वार्ता.) – खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली अन् ते खासदार म्हणून प्रचंड मतांनी निवडून आले. या दोघांनी केवळ त्यांच्या गटातील लोकांचा विचारविनिमय करून शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट मतदार आणि निष्ठावंत शिवसैनिक यांना कधीही पसंत पडणार नाही. खासदार संजय मंडलिक यांच्या कोट्यातून माझी (सुनील मोदी) पुणे रेल्वे बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती. खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात गेल्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ मी पुणे रेल्वे बोर्डाचे त्यागपत्र दिले आहे. खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या होय, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी आणि समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत केला.