येत्या २ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता !
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचे सदस्यत्व रहित व्हावे, यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन १-२ दिवसांमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असल्यामुळे राज्यात सरकार स्थापन होऊन २ आठवडे झाले, तरी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदांचीच शपथ झाली आहे; परंतु विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आल्याने काही मंत्र्यांचा शपथविधी घेण्यात येणार आहे.