परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सनातन संस्थेचे संत पू. रमानंद गौडा यांना आलेल्या अनुभूती
अनुभूतींतून सर्वांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाची चित्रफीत पहातांना ‘गुरुदेवांना पहातच रहावे’, असे वाटून अतिशय आनंद होणे
‘प.पू. गुरुदेवांच्या वर्ष २०२१ च्या जन्मोत्सवाच्या दिवशी प.पू. गुरुदेव साधकांना मार्गदर्शन करत असणारी चित्रफीत पहातांना ‘गुरुदेवांना अजून पहावे, त्यांना पहातच रहावे’, असे वाटत होते. त्यांना पाहून माझी भावजागृती होत होती. अंतःकरणातून ‘माझा देव, माझा देव’, असे शब्द येत होते. त्यामुळे मला अतिशय आनंद होत होता.
२. प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकातील त्यांचे चित्र पाहिल्यावर ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटून आनंद होणे
प.पू. गुरुदेवांचा ९.५.२०२१ या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा जन्मोत्सव विशेषांक पहातांनाही त्यातील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘त्यांना अजून पहावे, पहातच रहावे’, असे मला वाटत होते. तेव्हाही आतून ‘माझा देव, माझा देव’, असे शब्द येत होते. मला आनंद वाटत होता. असे मला बर्याच कालावधीपर्यंत अनुभवता आले. नंतर माझ्याकडून शरणागतभावाने प्रार्थना होत होती, ‘या जन्मातच मला तुमच्या चरणी समर्पित करवून घ्या.’
प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच अशा अनुभूती आल्या. त्याविषयी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
– (पू.) रमानंद गौडा, मंगळुरू (२१.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |