राजस्थानमध्ये भाजपच्या खासदाराला जिहाद्याकडून जिवे मारण्याची धमकी

भाजपचे खासदार किरोडीलाल मीना

जयपूर – भाजपचे खासदार किरोडीलाल मीना यांना कादीर अली याने पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली. उदयपूरमध्ये भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. या हत्येनंतर किरोडीलाल मीना यांनी कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य केले होते. त्यामुळेच त्यांना धमकी देण्यात आली आहे. ‘कन्हैयालाल यांच्या नंतर आता तुमचा क्रमांक’, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.

या धमकीनंतर मीना यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री यांना पत्र पाठवून आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘कादीर अली नावाच्या जिहाद्याला मी कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला केलेले आर्थिक साहाय्य आवडले नसल्याने त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली. मी अशा धमक्यांना घाबरत नाही. जिहादी वृत्तीच्या व्यक्तींना आश्रय देणार्‍या राजकीय शक्तींचे पितळ मी उघडे पाडीन. त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल’, असे किरोडीलाल यांनी त्यांच्या पत्रात लिहले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात आता हिंदूंचे नेतेही असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !