केंद्र सरकारने सुटे धान्य, लस्सी आदींवरील जी.एस्.टी. मागे घेतला !
नवी देहली – केंद्र सरकारने सुट्या धान्यावर लागू केलेला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) आता मागे घेतल्याची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. सुट्या डाळी, गहू, राई, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यांवर ५ टक्के जी.एस्.टी. द्यावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली. गेल्या मासात झालेल्या जी.एस्.टी. परिषदेच्या बैठकीत या वस्तूंवर ५ टक्के जी.एस्.टी. आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची कार्यवाही १८ जुलैपासून झाली होती.
#GST @FinMinIndia @PIB_India @PIBMumbai @PIBChandigarh @PIBHyderabad कर @pibchennai @PIBKolkata @PIBKohima @PIBGuwahati @PIBHindi @cbic_india https://t.co/EDWfuYnGzC
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) July 19, 2022