गेल्या ५ वर्षांत राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया ! – सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत
नवी देहली – राज्यसभेचा सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि शेवटचे सत्र (अधिवेशन) असून गेल्या ५ वर्षांमध्ये मला पुष्कळ शिकायला मिळाले आहे. गेल्या १३ सत्रांमध्ये नियोजित २४८ दिवसांपैकी केवळ १४१ दिवस कामकाज होऊ शकले, म्हणजे ५७ टक्के वेळ वाया गेला, अशी खंत राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.
नायडू यांचा पाच वर्षांचा कालावधी; आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला #venkaiahnaidu #rajyasabha #work #india #delhi #sakalnews https://t.co/YVpsUQuqlk
— SakalMedia (@SakalMediaNews) July 18, 2022
संपादकीय भूमिकासंसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही. भारतियांच्या करातून चालवण्यात येणारी संसद अशीच चालू रहात असेल, तर भारतियांनी आता त्यांच्या लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे ! |