नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी पाकमधील तरुणाची भारतात घुसखोरी !
जयपूर (राजस्थान) – पाकमधून सीमा पार करून भारतात घुससलेल्या पाकिस्तानी नागरिकाला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. रिझवान अश्रफ असे त्याचे नाव असून तो पाकच्या पंजाबमधील रहाणारा आहे. तो भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी भारतात घुसला होता, अशी माहिती त्याने दिली आहे. ‘पाकमध्ये उलेमांच्या (धार्मिक नियमांचे पालन होण्याकडे लक्ष ठेवणारे) बैठकीत नूपुर शर्मा यांच्या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर मी नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचे ठरवले’, असे त्याने सांगितले.
Pakistani national arrested in Rajasthan with 11-inch long knife meant to kill Nupur Sharma, planned to visit Ajmer Dargah before attack https://t.co/2r1mlP7wVN
— OpIndia.com (@OpIndia_com) July 19, 2022
संपादकीय भूमिकाभारताने अशांना पोसत रहाण्यापेक्षा त्याला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! |