केंद्र सरकारशी संलग्न संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १३, तर म. गांधी यांचे ३ लेख !

काँग्रेसकडून टीका

नवी देहली – केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाशी संलग्न असलेल्या ‘गांधी स्मृती संस्थे’ने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अंतिम जन’ या मासिकाचा विशेषांक प्रकाशित केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित असलेल्या या मासिकात सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित १३ लेख प्रकाशित करण्यात आले आहेत, तर मोहनदास गांधी यांच्यावरील ३ लेखांचा समावेश आहे. यामुळे या पत्रिकेला विरोध करण्यात येत आहे. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी ‘गांधीवादी विचारधारा भ्रष्ट करण्यासाठी ही पत्रिका काढली आहे’, असा आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही ही रा.स्व. संघाची कार्यसूची असल्याचा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेस कशी काय विसरते ?