बिहारमधील १५ सहस्र मुसलमान तरुणांना देशात घातपात करण्यासाठी देण्यात आले शस्त्रांचे प्रशिक्षण !
अटक करण्यात आलेल्या पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी दिली माहिती !
पाटलीपुत्र (बिहार) – बिहार राज्यातील बेरोजगार मुसलमानांना पैशांचे आमीष दाखवून त्यांना देशात आतंकवादी कारवाया करण्यासाठी सिद्ध केले जात आहे. राज्यातील १५ सहस्रांहून अधिक मुसलमान तरुणांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (‘पी.एफ्.आय’चे) कार्यकर्ते आणि आतंकवादी अतहर परवेज अन् अरमान मलिक यांनी चौकशीत दिली. तरुणांच्या प्रशिक्षणासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांत केंद्रे उघडण्यात आली होती. त्यांचे मुख्यालय पूर्णिया जिल्ह्यात होते.
After a terror module was busted in #Bihar the #Patna police interrogated several people and many shocking revelations have been made. According to officials, the #PFI have trained 15,000 youth to operate weapons inside #Bihar.
Saket & @ScribeAditya have more details. pic.twitter.com/J4J93mjtHm
— TIMES NOW (@TimesNow) July 18, 2022
पी.एफ्.आय.चे सदस्य गावांमध्ये फिरतांना अशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना हेरत होते. यांतील बरेच तरुण हे सरकारी व्यवस्थेविषयी अप्रसन्नता व्यक्त करत होते. त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. या हेरलेल्या तरुणांना काही प्रमाणात आर्थिक साहाय्य करण्यात येत होते. मग त्यांचा बुद्धीभेद केला जात होता. यामुळे अशिक्षित तरुण त्यांच्या गळाला लागत. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व्हॉट्सअॅप गटात जोडण्यात येत होते. हळूहळू त्यांना धर्माच्या नावाने भडकवण्यात येत असे. त्यानंतर हे तरुण शस्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी सिद्ध होत. ‘प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना काय करायला सांगितले जात होते ?’, याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.
संपादकीय भूमिकाअशांकडून होणारे घातपात रोखण्यासाठी भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि हिंदू सिद्ध आहेत का ? अशांना शोधून सरकार त्यांच्यावर कारवाई कधी करणार ? आणि त्यांना शिक्षा कधी करणार ?, हे प्रश्नच आहेत ! |