पायदुखी असणार्यांनी थंड फरशीशी थेट संपर्क टाळावा !
‘पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत फरशी थंड असते. विशेषतः संगमरवर, ग्रेनाईट, कोटा या प्रकारातील फरश्या अधिक थंड असतात. पायांचे तळवे, घोटे किंवा गुडघे दुखण्यामागील एक कारण ‘थंड फरशीशी सततचा थेट संपर्क’ हेही असते. यामुळे असे दुखणे असणार्यांनी थंड फरशीशी थेट संपर्क टाळण्यासाठी घरात किंवा कामाच्या ठिकाणी सपाता किंवा मोजड्या वापराव्यात.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.७.२०२२)