हिदूंना सतर्क करणारे पुस्तक : ‘इस्लाम और साम्यवाद के खतरे’ !
‘इस्लाम और साम्यवाद के खतरे’ हे पुस्तक राजकीय इस्लाम आणि साम्यवाद या दोन्ही विचारसरणींच्या धोक्यांविषयी सतर्क करणारे असून त्यांच्याशी लढण्याचे विविध मार्ग सांगणारे आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय स्थितीला समजण्यासाठी हे पुस्तक साहाय्यक आहे.
१. इस्लाम आणि साम्यवाद यांच्या धोक्यांविषयी सतर्क करणारे पुस्तक
भारतासह संपूर्ण जगाची शांती आणि विकास यांसाठी धोकादायक झालेले राजकीय इस्लाम अन् साम्यवाद (कम्युनिस्ट) यांचे आव्हान समजून घेणे आवश्यक आहे. राजकीय इस्लाम अनेक शतकांपासून मानवतेला नष्ट करू पहात आहे, तर साम्यवादाने मागील १०० वर्षांमध्ये त्यांची एकाधिकारशाही स्थापन करण्यासाठी रक्ताचे पाट वाहिले आहेत. साम्यवाद भलेही भांडवलशाहीने पराभूत झालेला असेल; परंतु एक मानसिकता म्हणून अनेक देशांत तो आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे ‘त्याचा धोका अल्प आहे’, असे समजता येत नाही. ‘इस्लाम और कम्युनिज्म’ हे पुस्तक या दोन्ही विचारसरणींच्या धोक्यांविषयी सतर्क करते अन् त्यांच्याशी लढण्याचा मार्ग दाखवते.
२. राजकीय इस्लामकडून असलेल्या धोक्यांना ओळखणे आवश्यक !
या पुस्तकामध्ये राजकीय इस्लाम आणि साम्यवाद यांच्या स्वरूपाविषयी जागतिक विद्वान बिल वार्नर, रिचर्ड बॅकिन आणि अलेक्झेंडर सोल्झेनित्सिन यांचे प्रामाणिक आकलन दिले आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती समजण्यासाठी याचे साहाय्य होईल. भारत आजही राजकीय इस्लाम आणि साम्यवाद यांचे लक्ष्य आहे; परंतु दोघांच्या प्रती भारतीय राजकीय बौद्धिक वर्गामध्ये मोठा भ्रम आहे. तथापि भारतात इस्लामी हिंसाचाराविषयी संकुचित दृष्टी ठेवल्यामुळे त्याच्या खर्या धोक्याविषयी निष्काळजीपणा वाढत चालला आहे. वस्तुत: हिंसात्मक आतंकवादाशी लढण्यापेक्षा प्रशासनाने राजकीय इस्लामकडून असलेल्या धोक्यांना ओळखणे आवश्यक आहे.
३. जिहाद्यांची मानसिकता
या पुस्तकानुसार विचारवंतांचा एक वर्ग राजकीय इस्लामला समजण्यात सर्वांत मोठी चूक करत आहे, ती म्हणजे तो मुसलमानांच्या एका वर्गाला उदार समजून चालत आहे; पण ते वास्तविकतेपासून पुष्कळ दूर आहेत. प्रत्येक मुसलमान प्रतिदिन ‘फातिहा’ वाचतांना मुसलमानेतरांना कोसत असतो. कुराणमध्ये मुसलमानेतरांवर घाणेरडे, घृणित, बंदर येथपर्यंत टीका केली आहे; परंतु त्यांना असे दुसर्यांनी म्हटलेले चालत नाही. त्यांच्याकडून सुरे आणि बाँब यांच्या धमक्या दिल्या जातात. जिहादी हिंसाचार याच नावावर होतो. कर्नाटकमधील शाळांमध्ये हिजाबच्या नावावर ज्या प्रकारचे राजकारण करण्यात येत आहे, त्यावरून लक्षात घेतले पाहिजे की, इस्लामचे ध्येय काय आहे ? ते ना कायद्याला मानतात आणि ना राज्यघटनेला ! त्यांच्यासाठी कुराण आणि शरीयत यांहून श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. कुराणमध्ये लिहिले आहे की, काफिराला त्रस्त केले जाऊ शकते आणि त्याचा अपमानही केला जाऊ शकतो. त्यामुळे मुसलमान अन्य व्यक्तीची हत्या करतो, तेव्हा त्याचा त्याला कोणताही पश्चात्ताप होत नाही; कारण याला तो इस्लामी कर्तव्य समजतो.
४. इस्लामप्रमाणेच साम्यवाद धोकादायक !
पुस्तकात असेही म्हटले आहे की, इस्लामच्या विचारांमध्ये सुधारणा शक्य आहे; परंतु त्याला राजकीय इस्लामच्या मतवादापासून वेगळे केले तर ! सध्या सर्वांत मोठी अडचण आहे की, हे काम केवळ मुसलमानच करू शकतात. सुदैवाने सुधारणावादी मुसलमानांची संख्या वाढत आहे. या धोक्यापुढे डोळे बंद करून घेणे शक्य नाही. राजकीय इस्लामचे ध्येय स्वतंत्र समाजाच्या राजकीय संस्थांना संपवून सगळीकडे शरिया कायद्याचे शासन स्थापन करणे आहे. राजकीय इस्लामप्रमाणेच साम्यवाद ही धोकादायक विचारसरणी आहे. ती दुसर्यांना संपवण्याला चुकीचे समजत नाही. या पुस्तकातील साम्यवादाचे प्रखर टीकाकार अलेक्झेंडर सोल्झेनित्सिन यांनी वर्ष १९७५-७६ मध्ये अमेरिका आणि इंग्लंड येथे दिलेली व्याख्याने अन् त्यांच्या मुलाखती यांचे अंश वाचल्यावर लक्षात येते की, त्यांनी पुष्कळ पूर्वीच साम्यवादाच्या विद्रूपतेचे अनुमान लावले होते. त्यांनी ज्या चेतावण्या दिल्या होत्या, त्या आज अक्षरश: सत्य सिद्ध होत आहेत.