‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त जिहादच्या विविध प्रकारांचा वैध मार्गाने प्रतिकार करण्याविषयी हिंदूंचे प्रबोधन करण्याचा निर्धार !
रामनाथी (गोवा) – मोगलांपासून आजपर्यंत इस्लामी जिहादच्या विरोधात निरंतर युद्ध चालूच आहे. हिंदूंच्या हत्या, हिंदू महिलांवर अत्याचार, बलात्कार करणे, संपत्ती लुटणे, धर्मांतर करणे, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, हेच इस्लामी जिहादचे धोरण आहे. इस्लामी जिहादला घाबरून रडण्यापेक्षा त्या विरोधात लढले पाहिजे. देहली येथे धर्मांधांनी घडवलेली दंगल, काश्मीरमध्ये हिंदूंच्या होणार्या हत्या, अशा अनेक घटना भारतात घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांच्या विरोधात निरंतर संघर्ष चालूच राहील, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील डासना पिठाच्या महंत प.पू. यती चेतनानंद सरस्वती यांनी केले.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे जिहादींच्या विरोधात केलेला संघर्ष’ या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर उत्तर कन्नड (कर्नाटक) येथील इतिहासकार डॉ. लक्ष्मीश सोंदा, इंदूर (मध्यप्रदेश) येथील अयोध्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी शरण, उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील विचारवंत श्री. विनोदकुमार सर्वाेदय, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. मोहन गौडा, कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील ‘हिंदु जागरण वेदिके’च्या मातृशक्ती प्रमुख सौ. पुष्पा आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतावर परकियांनी केलेली आक्रमणे आणि लूट हे इतिहासात जाणीवपूर्वक लपवण्यात आले ! – डॉ. लक्ष्मीश सोंदा, इतिहासकार, उत्तर कन्नड, कर्नाटक
भारतावर परकियांनी केलेली आक्रमणे आणि लूट, हे इतिहासात जाणीवपूर्वक लपवण्यात आले आहेत. इतिहासकारांनी १० सहस्र वर्षांचा इतिहास २ सहस्र ३०० वर्षांचा दाखवला आहे. आपला मागील ७ सहस्र वर्षांचा उज्ज्वल इतिहास विसरण्यास भाग पाडण्यात आले आहे. खिलजी आणि औरंगजेब यांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. विदेशी दृष्टीकोन ठेवून इतिहास लिहिला आहे. इतिहासाचे गांभीर्य लपवले. मोगलांनी केलेले अत्याचार लपवले. गणित आणि भौतिकशास्त्र यांतील आपला इतिहास लपवण्यात आला. केवळ मोगलांच्या भोवती इतिहास फिरवला. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आपला इतिहास नव्याने लिहिला पाहिजे, असे प्रतिपादन इतिहासकार डॉ. लक्ष्मीश सोंदा यांनी केले. ते ‘भारतीय इतिहासाचे इस्लामीकरण आणि खरा इतिहास’ या विषयावर बोलत होते.
हिंदूंनी मुलांना हिंदुस्थानचा भौगोलिक आणि धार्मिक इतिहास सांगितला पाहिजे ! – मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन, इंदूर, मध्यप्रदेश
हिंदुस्थानातील हिंदूंची भूमी ही हिंदूंचे राष्ट्र आहे. इतिहास हा राष्ट्राचे भविष्य ठरवतो. इतिहासाची संपूर्ण माहिती असल्याविना आपण लढू शकणार नाही; कारण इतिहास आपल्या जीवनाशी जोडलेला आहे. देशाची फाळणी झाल्यानंतर लाखो हिंदूंची हत्या करण्यात आली, हा इतिहास आपण विसरू शकत नाही. मौलाना अबुल कलाम म्हणतात, ‘‘धर्मांतर करून आम्ही भारत कह्यात घेऊन त्याचे इस्लामीकरण करू.’’ त्यामुळे आपण आपल्या मुलांना आपला भौगोलिक आणि धार्मिक इतिहास सांगितला पाहिजे. मुसलमान त्यांच्या मुलांना मदरशामध्ये नेतात आणि कुराण वाचायला लावतात, त्याप्रमाणे हिंदूंनी आपल्या मुलांना नृत्य, मुद्रा आणि शास्त्र यांचे शिक्षण द्यायला हवे. घरी ब्राह्मण बोलावून मुलांना शास्त्रांचे ज्ञान द्यावे. या वेळी इतिहासातील विविध दाखले देऊन मीनाक्षी शरण यांनी माहिती दिली.
हिंदू आक्रमकांपुढे झुकल्यामुळेच इस्लामी आक्रमकांनी मंदिरे पाडली ! – विनोदकुमार सर्वाेदय, विचारवंत, गाझियाबाद, उत्तरप्रदेश
हिंदूंमधील देशभक्ती नष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे ‘देशासाठी काही करावे’, असे हिंदूंना वाटत नाही. धर्मकार्य करण्याऐवजी हिंदू आरामात जीवन जगू पहात आहेत. धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंच्या मुलांना धर्मशिक्षण द्यायला हवे. आत्मरक्षणासाठी सैनिकी शिक्षण द्यायला हवे. हिंदू इस्लामी आक्रमणापुढे झुकले. त्यामुळेच आक्रमकांनी मंदिरे पाडली. आम्ही राज्यघटना मानतो. त्यामुळे त्या विरोधात जाणार नाही; मात्र ही वस्तूस्थिती आहे. आपले नेते म्हणतात, ‘‘हिंदू आणि मुसलमान यांचा ‘डी.एन्.ए.’ एक आहे’; परंतु आपले संस्कार एक नाहीत, असे वक्तव्य उत्तरप्रदेश येथील विचारवंत श्री. विनोदकुमार सर्वाेदय यांनी केले. ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये ‘इस्लामी जिहादपासून मुक्तीचा मार्ग आणि हिंदूंमधील जागृती’ या विषयावर ते बोलत होते.
‘हिंदु जागरण वेदिके’च्या मातृशक्ती प्रमुख सौ. पुष्पा यांनी कथन केला ‘लव्ह जिहाद’विषयीचा स्वत:चा भीषण अनुभव !
माझा एका मुसलमान युवकाशी बेंगळुरू येथील जामिया मशिदीमध्ये विवाह झाला. त्याच्या कुटुंबात १८ जण होते. घरात मुलाची आई आणि बहिणी यांच्याकडून मला सातत्याने त्रास दिला जात होता. मी आजारी असतांनाही त्या मला भांडी घासायला लावत असत. रक्त येईपर्यंत मला मारहाण केली जात असे. गरोदर असतांनाही मला पती बुक्क्याने मारत होता. नमाजपठण केले नाही, तर सासू मला ‘तुझा मुलगा हराम होईल’, असे म्हणत असे. बाळंतपण होण्यापूर्वीच माझ्या मुलांची मुसलमान नावे ठेवण्यात आली होती. मला ११ वर्षे वशीकरण करून ठेवण्यात आले. एक दिवस मी दुर्गामातेच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्या वेळी देवीचे फूल माझ्यावर पडले. त्यानंतर ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण करून मला हिंदु धर्मात घेतले. माझी मुले आता सनातन धर्माची आहेत. मी हिंदु धर्माचा मार्ग निवडला. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या आणि घरवापसी करण्यास (शुद्धीकरण करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्यास) सिद्ध असलेल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन सौ. पुष्पा यांनी केले.
या वेळी ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकल्यामुळे पुष्पा यांचा झालेला छळ ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
कर्नाटकातील होसतोडकू उत्सवाच्या वेळी आंदोलन आणि जनजागृती करून हलाल मांस पद्धत बंद केली ! – मोहन गौडा, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक
कर्नाटकात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ‘होसतोडकू’ उत्सव साजरा केला जातो. यामध्ये कालीमाता आणि कालभैरव या देवतांना मांसाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवतांना झटका मांस देण्याऐवजी ‘हलाल’ पद्धतीचे मांस देण्यात येत होते. हे अनुचित, तसेच हिंदु देवता आणि हिंदू यांचा अवमान करणारे होते. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करून पत्रकार परिषद आणि आंदोलन यांद्वारे आम्ही विरोध दर्शवला. ‘हलाल’च्या विरोधात मोहीम राबवून जनजागृती केली. हिंदूंना आमचे म्हणणे पटले. मुख्यमंत्र्यांपासून ते भाजपच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी या मोहिमेचे समर्थन केले, तसेच आम्ही हिंदु खाटिक समाजाला ‘झटका’ मांस देण्यास प्रोत्साहित केले. त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यांचाही झटका मांस विक्रीचा व्यवसाय चालू झाला. धर्मांध कसायांची दुकाने रिकामी पडली. हिंदु खाटिकांच्या दुकानासमोर लोकांची मांस खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. ७०० ठिकाणी झटका मांस विक्रीची दुकाने चालू करण्याची मागणी हिंदूंनी केली. त्यामुळे कोट्यवधी रुपये हलाल मांस विक्री करणार्यांना मिळत होते, ते हिंदु खाटिक समाजाला मिळाले. ईश्वराच्या कृपेने हे आंदोलन अशा पद्धतीने यशस्वी झाले.