पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१. संतसन्मान सोहळ्याच्या पूर्वी
१ अ. त्रासदायक अनुभूती : ‘पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या आदल्या दिवशी मला त्रास होत होता. ‘मी रुग्णाईत होऊन मला या सोहळ्यात उपस्थित रहाता येऊ नये’, यासाठी मोठी वाईट शक्ती प्रयत्न करत होती.
१ आ. पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार संतपदी विराजमान होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : सोहळ्याची सिद्धता चालू होती. तेव्हा मला वाटले, ‘आज श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार संतपदी विराजमान होणार आहेत.’ ते रामनाथी आश्रमात जाऊन आले. ‘उत्तर भारतातील साधकांना हा सोहळा अनुभवता यावा आणि प्रत्यक्ष पहाता यावा’, यासाठी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने या सोहळ्याचे आयोजन झाले आहे.’
२. संतसन्मान सोहळ्याच्या वेळी
अ. एकदा गुरुदेव मला पू. संजीव कुमार यांच्याविषयी म्हणाले होते, ‘‘संजीवच तुझे पिता आहेत.’’ गुरुदेवांचे बोलणे मला पू. संजीव कुमार आणि पू. माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी सतत आठवत होते.
‘पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांना नमस्कार करावा’, असे मला वाटत होते. गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांना नमस्कार करण्याची संधी मिळाली.
आ. सोहळ्याची दिवशी माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र (२३.१२.२०२१)
|