गुरुकृपेचा वर्षाव करूनी कलियुगी आम्हा उद्धरिसी ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सृष्टीच्या सागरा, विष्णु अनंतरूपा ।
गुरुकृपेचा वर्षाव करूनी कलियुगी आम्हा उद्धरिसी ।
धर्माचे उत्थापन करूनी अधर्माचे उच्चाटन करिसी ।
सात्त्विकता प्रदान करूनी दुष्कर्माचा संहार करिसी ।। १ ।।
भक्तवत्सल तू तारण्या आम्हासी, भाव-भक्तीचे वृक्ष लाविसी ।
तेणे होती उत्पत्ती संतांची, साधक घडती पदोपदी ।
नाम दिले वैखरी, लावले सर्वा दत्ताचे ध्यान ।
मिटवले ऋण पूर्वजांचे अन् समाजाचे, दिला धर्माचा अतूट विश्वास ।। २ ।।
विष्णुरूप तव बिंब, म्हणून करिसी पालन भक्तांचे ।
वैभव ते आणसी पृथ्वीवरी, रामराज्य येईल पुन्हा ।
उद्धार करण्यासी दिला मंत्र, स्वभावदोष अन् अहं निर्मूलन करण्याचा ।
साधकांच्या सहस्रो जन्मांचे सार्थक केले एका जन्मात ।। ३ ।।
नव्हता वाली कुणी धर्माला, म्हणूनी भार झाला भूवरी ।
केले हिंदूंचे वृक्षारोपण, वाचवले त्यांचे उच्चाटन (टीप १)।
होईल संहार दुष्ट प्रवृत्तींचा, नांदतील सुहृद, सज्जन जन ।
होईल भूभार तेणे न्यून, नांदेल ईश्वरी राज्य भूवरी ।। ४ ।।
शेष हिंदू होईल वटवृक्ष, शांती जगी पसरेल (टीप २)।
त्वा तो धुरा सांभाळिला, तेणे सार्थक केले विष्णु अवताराने ।
प्रीतीची ग्वाही दिली, सौख्य नांदण्या भूवरी ।
क्षात्रभावाचे दिले वज्र, सांभाळण्या या वसुदेव कुटुंबकाचे ।। ५ ।।
रहाण्या अखंड रामराज्य, सनातनचे हार ओविले ।
अधिष्ठान दिलेस देवा, कृतार्थ केले तव विष्णुरूपास ।
चैतन्याचा महामेरू, आध्यात्मिक शोध करसी ।
तेणे आधार होईल पुढच्या पिढीस, तेणे धर्माे रक्षति रक्षितः (टीप ३) ।। ६ ।।
प.पू. भक्तराज महाराज यांचे हे भक्त, तयांनी केले लिखाण अगणित ।
तेणे केले संरक्षण धर्म संस्कृतीचे, लक्षात आले हेच ते अवतार विष्णूचे ।
शिव-विष्णु शक्ती एकवटली, हेच होते विधान नाडीपट्टीचे ।
न्हाहून घ्या या पवित्र गंगेत, सार्थक होईल या जिवांचे (टीप ४) ।। ७ ।।
टीप १ – जन्महिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व पटवून देऊन त्यांना धर्मांतर करण्यापासून वाचवले.
टीप २ – आपत्काळानंतर जे हिंदू शेष रहातील, त्यांच्यामुळे जगात शांती पसरेल.
टीप ३ – धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.
टीप ४ – भूमातेवरील सर्व जिवांचे
– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२२)