वैदुवाडी (पुणे) येथील १५ झोपड्या जळून खाक
पुणे – पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरातील सुरक्षानगरमधील झोपड्यांना १७ जुलैच्या मध्यरात्री २ च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये १५ घरे जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र या दुर्घटनेमध्ये अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. या दुर्घटनेची माहिती स्थानिकांनी अग्नीशमनदलाला दिली असता ५ बंबांनी आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले. हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी आगीचा पंचनामा केला.