अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाची आत्महत्या !
पुणे – अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरचा चुलत भाऊ अक्षय माटेगावकरने मानसिक तणावातून २१ व्या वर्षीच पुण्यात रहात्या घरी आत्महत्या केली आहे. अक्षयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ज्यात त्याने नोकरी मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे लिहिले आहे. अभियंता झालेल्या अक्षयला ‘नोकरी मिळत नाही, आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही’, असा तणाव होता. (कितीही उच्चशिक्षण घेतले, तरी मनोबल किंवा आत्मबळ नसेल, तर आयुष्यात येणार्या नैराश्याला सामोरे जाता येत नाही; पण साधनेमुळे नैराश्यावर मात करता येते. – संपादक)
‘जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’च्या मानसोपचारतज्ञ डॉ. रितिका अगरवाल म्हणाल्या की, शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजारांना फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. मानसिक तणाव आणि नैराश्य यांमधून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे, हे लगेच होते असे नाही. याची लक्षणे आधीच दिसू लागतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसली, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका.
संपादकीय भूमिका‘जीवनात येणार्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे न जाता आत्महत्या करणे अयोग्य आहे’, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे ! |