मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची नवीन कार्यकारिणी घोषित !
मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे, तर प्रवक्तेपदी दीपक केसरकर
मुंबई – शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारिणी घोषित केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदी अजूनपर्यंत कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. कार्यकारिणीत नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे.