कर्जवसुली करणार्या कर्मचार्याला धमकावणार्या धर्मांधाला अटक !
मुंबई – वरळी येथे कर्जवसुली करणार्या कर्मचार्याला बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देणार्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. बच्चन खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
#Mumbai Crime : “दोबारा पैसा मांगा तो इधर ही ठोक डालूंगा,” लोन फर्ममधील कर्मचाऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावलं, मुंबईतील रहिवासी अटकेतhttps://t.co/mPn4D1eEdf @faisaltandel1
— ABP माझा (@abpmajhatv) July 18, 2022
खान याने कर्जपुरवठा करणार्या आस्थापनातून कर्ज घेतले होते. कर्जवसुलीसाठी आस्थापनाचे प्रकाश माळी हे खान यांच्याकडे गेले. तेव्हा त्याने परवानाधारक शस्त्र दाखवून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी माळी यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी खान याला अटक करून त्याच्याकडून परवाना बंदूक आणि ८ काडतुसे कह्यात घेतली आहेत. परवाना रहित करण्याची प्रक्रिया चालू आहे.
संपादकीय भूमिकाउद्दाम धर्मांध ! |