७५ वर्षीय हिंदु वृद्ध व्यक्तीची तिच्या सुनेचा मुसलमान प्रियकर आणि सहकारी यांच्याकडून हत्या
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील ७५ वर्षीय जसवंत शर्मा यांची हत्या त्यांची सून कविता हिचा प्रियकर इरशाद आणि त्याचे मित्र परवेझ, नौशाद अन् साजिद यांनी केल्याचे उघड झाले आहे. कविता हिला संपत्तीमध्ये वाटा देण्यात न आल्याने ही हत्या करण्यात आली.
“बहू ने ही रची थी बुजुर्ग की हत्या की व लूट की साजिश “#GhaziabadPoliceInNews#UPPInNews #UPPolice #Ghaziabad #GhaziabadPolice pic.twitter.com/3TewUVuLUQ
— GHAZIABAD POLICE (@ghaziabadpolice) July 18, 2022
पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. परवेझ याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात परवेझ घायाळ झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार इरशाद कविताकडे पैसे मागत होता; मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचला.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादचा भयानक परिणाम ! |