सद्गुरु स्वाती खाडये यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. ‘सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.
२. त्यांचे सगळीकडे बारकाईने लक्ष असते. ‘अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये’, अशी त्यांची तीव्र तळमळ आहे.
३. प्रीती
सद्गुरु ताई एखादा पदार्थ स्वतः बनवून आश्रमातील साधकांना खाऊ घालतात. एखादा साधक रुग्णाईत असल्यास त्या त्याच्यासाठी काढा आणि खीर बनवून देतात.
४. चैतन्यमय वाणी
सद्गुरु ताईंच्या अपार कृपेमुळे आम्हाला ‘ऑनलाईन विष्णुलीला सत्संगा’चा आनंद घेता येतो. ‘सद्गुरु ताईंचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते आणि त्यांचे बोलणे काळजाला जाऊन भिडते.
५. अनुभूती
अ. सद्गुरु ताई पहाटे उठून साधकांसाठी आर्तभावाने नामजप करतात. त्या वेळी ‘साक्षात् दुर्गामाताच आमच्यासाठी नामजप करत आहे’, असे मला वाटते.
आ. सद्गुरु ताई मार्गदर्शन करतांना ‘आम्हाला त्रास देणार्या वाईट शक्ती नष्ट होत आहेत’, असे मला जाणवते.इ. सद्गुरु ताई आश्रमातून ये-जा करतांना ‘सर्वांना पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवते.
ई. मध्यंतरी ‘सद्गुरु ताई सूक्ष्मातून आमच्या घरी येत आहेत’, असे मला जाणवायचे. तेव्हापासून आमच्या घरातील त्रास पुष्कळ प्रमाणात न्यून झाल्यासारखे वाटते.
उ. माझी दोन्ही मुले सोलापूर सेवाकेंद्रात सद्गुरु ताईंच्या सहवासात राहून आल्यापासून आमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडचणी सुटत आहेत.
ऊ. माझी मुलगी सद्गुरु ताईंविषयी सांगत असतांना ‘सद्गुरु ताई आमच्या जवळ आहेत’, असे मला जाणवते आणि मला त्यांचे दर्शन होते.
ए. ही सूत्रे लिहितांना ‘माझ्या हातांच्या ओंजळीत मोगर्याची फुले आहेत आणि ती फुले मी प.पू. गुरुदेव अन् सद्गुरु माता यांच्या चरणांवर वहात आहे’, असे मला जाणवत होते.
‘हे गुरुदेवा, ‘माझी काहीच पात्रता नसतांना मला सद्गुरु ताईंविषयी लिहिण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अश्विनी चोरमले, शिरसोडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. (२४.५. २०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |