भारतात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळला
नवी देहली – भारतात केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. संबंधित व्यक्ती १३ मे या दिवशी दुबईहून भारतात परतली आहे. तिला ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झाल्याचे आता, म्हणजे २ मासांनंतर आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वीही विदेशातून केरळमध्ये परतलेल्या व्यक्तीलाच हा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.
आतापर्यंत जगभरातील २७ देशांमधील एकूण ८०० लोकांना याचा संसर्ग झाला आहे. हा संसर्ग कोरोना महामारीसारखा जीवघेणा नसून तो कोरोना विषाणूसारखा गतीने पसरत नसल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत या संसर्गामुळे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
‘मंकीपॉक्स’ची लक्षणे कोणती ?
‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप, पुष्कळ डोकेदुखी, शरिराला सूज आणि थकवा अशी लक्षणे आढळून येतात.