भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी इस्लामी देशांकडून ‘पी.एफ्.आय.’ला अर्थपुरवठा !
पाटलीपुत्र (बिहार) – येथील फुलवारी शरीफमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ३ कार्यकर्त्यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या साहित्यावरून वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र उजेडात आले. या तिघांच्या चौकशीतून आता नवी माहिती समोर आली आहे की, तुर्कीये देशासह अनेक इस्लामी देशांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला अर्थपुरवठा केला जात आहे.
पटना से गिरफ्तार हुए संदिग्ध आतंकियों से पूछताछ में पता चला है कि कई मुस्लिम देश PFI को फंडिंग कर रहे हैं.#PFIFunding #TerrorFunding #PFI #Patna #Biharhttps://t.co/QkSkJWfxZp
— ABP News (@ABPNews) July 18, 2022
१. अटक करण्यात आलेला आतंकवादी दानिश हा पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’शी संबंधित आहे. तो पाकमधील फैजान नावाच्या व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात होता.
२. पी.एफ्.आय. संघटनेत एका पुस्तकाचे वितरण करण्यात येत होते. यात भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याविषयीची योजना आहे. त्यानुसार हे कार्यकर्ते कार्य करत होते. ते पाटलीपुत्र येथे आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवत होते.
संपादकीय भूमिका
|