चंद्रूला उर्दू भाषा येत नसल्याने त्याची हत्या करण्यात आली ! – आरोपपत्रातील माहिती
|
बेंगळुरू – येथे ५ एप्रिल २०२२ या दिवशी २१ वर्षीय शाहिद पाशा, २२ वर्षीय शाहिद गोली आणि अन्य एका अल्पवयीन मुलगा यांनी चंद्रू नावाच्या एका हिंदु युवकाची हत्या केली होती. या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपपत्र प्रविष्ट केले असून त्यामध्ये ‘२२ वर्षीय चंद्रूची हत्या ही त्याला उर्दू भाषा बोलता येत नसल्यामुळे करण्यात आली’, असे म्हटले आहे.
५ एप्रिलच्या रात्री चंद्रू आणि त्याचा मित्र हे दुचाकीवरून चालले असतांना चंद्रूकडून आरोपी शाहिद पाशा याच्या दुचाकीला धक्का लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. चंद्रू कन्नड भाषेत बोलत होता. त्याला उर्दू भाषा येत नसल्याने राग अनावर झालेल्या तिघा आरोपींनी त्याच्यावर चाकूद्वारे आक्रमण केले. यात तो गंभीररित्या घायाळ झाला. पुढे रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाउर्दू भाषा न आल्याने एखाद्या हिंदूची हत्या करण्यात येणे, यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ? पोलिसांनी संबंधित धर्मांधांना फाशी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते ! |