सिवान (बिहार) येथील शिवमंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत २ महिलांचा मृत्यू, अनेक भाविक घायाळ
सिवान (बिहार) – उत्तर भारतात श्रावण मासाला प्रारंभ झाला असून येथील बाबा महेंद्रनाथ शिवमंदिरात पहिल्या सोमवारनिमित्त येथे गर्दी झाली होती. येथे जलाभिषेकाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत २ महिलांचा मृत्यू झाला, तर काही भाविक घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
#Bihar : बाबा महेंद्रनाथ शिवमंदिर में मची भगदड़ https://t.co/UdBBWqYiE0
— AajTak (@aajtak) July 18, 2022
या घटनेनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.