बरेली (उत्तरप्रदेश) येथे ४ धर्मांध मुसलमानांकडून एका १२ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार
बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या बरेलीमधील बिथरीचैनपूर येथील एका १२ वर्षीय हिंदु विद्यार्थिनीचे ४ धर्मांध मुसलमान युवकांनी तिच्या शाळेजवळून अपहरण केले. त्यांनी तिला रात्रभर ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसर्या दिवशी सकाळी तिला शहादाना मझारजवळ फेकून आरोपींनी पळ काढला, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली.
शुक्रवार, १५ जुलैला सकाळी शाळेत गेलेली मुलगी दुपारपर्यंत घरी परतली नाही. कुटुंबियांनी चौकशी केली असता, ती शाळेत पोचलीच नसल्याचे त्यांना समजले. बराच प्रयत्न करूनही मुलीचा शोध न लागल्याने कुटुबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. दुसर्या दिवशी सकाळी वाटसरूंच्या साहाय्याने मुलगी घरी पोचली असता तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
Bareilly, UP: Uvaish, Nadeem and 2 other M men abduct and gangrape a 13 yr old #Hindu girl. After 24 hrs she is left outside a mazar. Uvaish & Nadeem arrested. Police looking for 2 more.#RapeJihad#SexTrafficking#HindusUnderAttack https://t.co/JNPzt4wu99
— Stop Hindu Hate Advocacy Network (SHHAN) (@HinduHate) July 17, 2022
या प्रकरणी पोलिसांनी उवैश आणि नदीम या दोन धर्मांध आरोपींना कह्यात घेतले आहे, तर इतर दोन आरोपींचा शोध घेतला जात आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सत्यार्थ अनिरुद्ध यांनी दिली. धर्मांधांच्या या क्रूर कृत्याची माहिती मिळताच हिंदु गोरक्षक दलाचे महानगर अध्यक्ष हिमांशू पटेल यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांध बलात्कार्यांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |