वरिष्ठ अधिकारी शफीक अहमद आणि जकी अहमद हिंदू कर्मचार्यांकडून बनवून घेतात मांसाहारी पदार्थ !
सीतापूर (उत्तरप्रदेश) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील हिंदू कर्मचार्यांचा आरोप
सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तैनात असणारे आयपीएस् अधिकारी शफीक अहमद आणि जकी अहमद यांनी छळ केल्याची तक्रार येथील कर्मचार्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. यांपैकी काही कर्मचार्यांना सदर अधिकार्यांनी निलंबितही केले आहे.
‘Forced to cook meat, harassed when denied’: Suspended Hindu police personnel in Sitapur, UP allege discrimination by IPS Shafiq Ahmed, ADG Zaki Ahmedhttps://t.co/4cMKkZIEHI
— OpIndia.com (@OpIndia_com) July 16, 2022
१. निलंबित कर्मचार्यांचा आरोप आहे की, शफीक अहमद गेल्या ६ वर्षांपासून या केंद्रामध्ये तैनात आहेत. ते हिंदु कर्मचार्यांकडून जाणीवपूर्वक मांसाहारी जेवण बनवून घेतात. जो याला विरोध करतो, त्याला निलंबित केले जाते. अतिरिक्त पोलीस महासंचालक जकी अहमद यांच्याकडून सर्व मुसलमान अधिकार्यांना पाठीशी घातले जात आहे.
२. जकी अहमद कानपूर येथे तैनात असतांना तेथेही त्यांच्या विरोधात ५३ हिंदु कर्मचार्यांनी गंभीर आरोप केले होते. त्याविषयी त्यांची चौकशीही चालू आहे; मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिका
|